जागतीक दिव्यांग दिनानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप



छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी):- स्व. गणपतराव कदम निवासी मूकबधिर शाळा सिङको परिसर औरंगाबाद येथे जागतीक दिव्यांग दिना निमित्त शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. आणि विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी आरोग्य जागृतीचे संपादक डॉ. अफसर शेख, यशादाचे मास्टर ट्रेनर सतीश वानखेडे, एनसीपीचे शहर अध्यक्ष अब्दुल समीर, काँग्रेसचे शहर अध्यक्ष शेख मोईन,

सरचिटणीस अनिस पटेल, शेख मोहसीन शेख अफरोज, अहमद पटेल जिल्हा उपाध्यक्ष, सूत्र संचालन शेख मुक्तर सर यांनी केले तर आभार प्रदर्शन संस्थेचे अध्यक्ष साजीद पटेल यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतर्फे रुविणा सैय्यद, डॉ. शेख सवा, सना शेख, शेख अंजुम, अक्षय शिंदे अधीक्षक, प्रशांत चव्हाण, दिनेश चव्हान, दिनेश शिंदे, नविद बागवान, सैय्यद अझरुद्दीन, मोहम्मद इसान, सदेक चिस्ती, इमाम मौलाना आदींची उपस्थिती होती.